Show simple item record

dc.contributor.authorMaharashtra Times, Pune
dc.contributor.authorमहाराष्ट्र टाइम्स, पुणे
dc.contributor.authorRanade, Ajit
dc.contributor.authorरानडे, अजित
dc.contributor.authorPathak, Varad
dc.contributor.authorपाठक, वरद
dc.contributor.authorShewale, Nanaji
dc.contributor.authorशेवाळे, नानाजी
dc.date.accessioned2022-03-16T09:18:27Z
dc.date.available2022-03-16T09:18:27Z
dc.date.issued2022-03-13
dc.identifier.urihttps://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/digitization-of-literary-resources-in-gadgil-library/articleshow/90180218.cms
dc.identifier.urihttp://hdl.handle.net/10973/54776
dc.descriptionगोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या ऐतिहासिक धनंजयराव गाडगीळ ग्रंथालयातील तीस हजार जुन्या व दुर्मीळ साहित्यसंपदेचे डिजिटायझेशन करण्यात आले आहे. पुणे : गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या ऐतिहासिक धनंजयराव गाडगीळ ग्रंथालयातील तीस हजार जुन्या व दुर्मीळ साहित्यसंपदेचे डिजिटायझेशन करण्यात आले आहे. त्यामध्ये संस्थेच्या स्थापनेपासूनचे वार्षिक अहवाल, प्रबंध, शोधनिबंध, प्रकाशनांसह ब्रिटिशांनी १८७२ मध्ये केलेल्या देशाच्या पहिल्या जनगणनेपासून १९५१पर्यंतच्या जनगणनेचे अहवाल, विदर्भातील पहिले वृत्तपत्र 'वऱ्हाड समाचार'चे १८६८ पासूनचे अंक, 'माणूस'कार श्री. ग. माजगावकर यांच्या 'माणूस' नियतकालिकाचे १९६१ पासूनचे अंक आदी साहित्यठेवा पीडीएफ स्वरूपात डिजिटली उपलब्ध करण्यात आला आहे. ग्रंथालयाच्या https://dspace.gipe.ac.in या संकेतस्थळावरून हा साहित्य खजिना संशोधक आणि साहित्यप्रेमींना मोफत डाउनलोड करून वाचता येत आहे. दररोज पंधराशेहून अधिक वाचक त्याचा लाभ घेत असून, पन्नासहून अधिक देशांतील वाचकांनी या डिजिटल ग्रंथालयाला ऑनलाइन भेट दिली आहे, अशी माहिती ग्रंथालयाचे ग्रंथपाल प्रा. नानाजी शेवाळे यांनी दिली. 'सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी'चे संस्थापक गोपाळ कृष्ण गोखले यांनी सोसायटीचे पदाधिकारी आणि सर्वसामान्यांसाठी सार्वजनिक ग्रंथालय सुरू केले. गोखले संस्थेची १९३०मध्ये स्थापना झाल्यावर, संस्थेने शैक्षणिक व संशोधनात्मक कामांसाठी या ग्रंथालयाचा उपयोग सुरू केला. त्याचबरोबर त्याचे सार्वजनिक स्वरूपही जपले आहे. पदवीधारक नागरिकांना या ग्रंथालयाचे सभासद होता येते. या ग्रंथालयात सध्या दोन लाख ८४ हजार पुस्तके आहेत. त्यापैकी अनेक पुस्तके दुर्मीळ आहेत. त्यात नामदार गोखले यांच्या संदर्भातील समग्र साहित्य, जुन्या जनगणनांची कागदपत्रे, गोखले संस्थेचे वार्षिक अहवाल, संशोधन अभ्यास, विविध आयोग आणि समित्यांचे अहवाल, 'बँक ऑफ महाराष्ट्र'चे संस्थापक वामन गोविंद काळे आणि निबंधकार श्रीपाद वामन काळे यांचे 'अर्थ' या नियतकालिकांचे जुने अंक, १९३७पासूनची आर. एम. काळे स्मृती व्याख्याने अशा विपुल साहित्याचा समावेश आहे. राज्यशास्त्र व अर्थशास्त्र विषयातील तज्ज्ञ, संशोधक, विद्यार्थी विविध संदर्भ शोधण्यासाठी आवर्जून या ग्रंथालयात येतात. यापैकी अनेक पुस्तकांची पाने जीर्ण होऊ लागली आहेत. त्यामुळे या दुर्मीळ साहित्य ठेव्याचे जतन करण्यासाठी ग्रंथालयाने डिजिटायझेशन सुरू केले आहे. याशिवाय विनायक पुरोहित यांचे समग्र साहित्य, वऱ्हाड समाचार, 'माणूस'चे ऐतिहासिक अंकही डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिले आहेत. दर वर्षी ग्रंथालयातील तीन हजार पुस्तके पीडीएफ स्वरूपात रूपांतरित केली जात असून, आगामी काळात 'कॉपीराइट'मुक्त असलेली साठ हजार पुस्तके डिजिटाइज केली जाणार आहेत, असेही शेवाळे यांनी सांगितले. धनंजयराव गाडगीळ ग्रंथालय देशातील जुने व विशेष ग्रंथालय आहे. सध्याच्या डिजिटल युगात हे ग्रंथालय डिजिटली अद्ययावत करण्यावर भर दिला जात आहे. ग्रंथालयातील दुर्मीळ पुस्तकांचा फायदा अधिकाधिक विद्यार्थी, संशोधकांना व्हावा, यासाठी त्यांचे डिजिटायझेशन केले जात आहे. त्याला जगभरातील वाचकांकडून प्रतिसाद मिळत आहे. येत्या काळात विविध संशोधन साहित्य-नियतकालिके, तज्ज्ञांची दृकश्राव्य स्वरूपातील व्याख्याने, पॉडकास्टही ग्रंथालयाच्या माध्यमातून डिजिटली उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. - डॉ. अजित रानडे, कुलगुरू, गोखले संस्थाen_US
dc.language.isootheren_US
dc.publisherMaharashtra Times, Puneen_US
dc.titleगाडगीळ ग्रंथालयातील साहित्य संपदेचे डिजिटायझेशनen_US
dc.typeArticleen_US


Files in this item

Thumbnail
Thumbnail

This item appears in the following Collection(s)

Show simple item record