Show simple item record

dc.contributor.authorशिवा, वंदना
dc.contributor.authorshiva, Vandana
dc.contributor.authorMaharashtra Times, Pune
dc.date.accessioned2016-01-13T10:02:12Z
dc.date.available2016-01-13T10:02:12Z
dc.date.issued2016-01-13
dc.identifier.urihttp://hdl.handle.net/10973/38573
dc.description.abstractप्रगत देशांपासून भारताने दूर राहावे : शिवा म. टा. प्रतिनिधी, पुणे 'जागतिक तापमानवाढीमुळे ओढावलेल्या संकटांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर बाजारीकरण सुरू झाले असून प्रगत देश विकसनशील देशांवर त्यांची विचारसरणी आणि औद्योगिक उत्पादने लादण्याचा प्रयत्न करीत आहेत. पॅरिसमध्ये झालेल्या परिषदेमध्ये विकसित देशांनी भारताला मदत करण्याची तयारी दाखविण्यामागे छुपा अजेंडा आहे. आपण या प्रलोभनांपासून दूर राहिले पाहिजे,' असे मत पर्यावरण चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या डॉ. वंदना शिवा यांनी व्यक्त केले. गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सतर्फे डॉ. शिवा यांचे 'द पॅरिस क्लायमेट चेंज अॅग्रीमेंट : व्हॉट शूड इंडिया अँड वर्ल्ड डू' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या वेळी एच. एम. देसरडा व राजस परचुरे यांनीही मनोगत व्यक्त केले. संयुक्त राष्ट्र संघाच्या जागतिक हवामान बदल समितीने गेल्या पंधरा वर्षात घेतलेल्या विविध परिषदा आणि त्यातील निर्णय़ांचा धावता प्रवास शिवा यांनी मांडला. 'प्रगत देशांनी १९९२ मध्ये स्वतःवर काही बंधने लादून घेण्याबरोबरच विकसनशील देशांना मदत करण्याचे मान्य केले होते. कार्बन उत्सर्जन पाच टक्क्यांनी कमी करण्याचे ध्येय त्या वेळी निश्चित करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात गेल्या वीस वर्षात अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये पंधरा टक्क्यांनी उत्सर्जनामध्ये वाढ झाली आहे. या देशांनी गुंतवणूक आणि आर्थिक प्रगतीचे प्रलोभन दाखवून कार्बन उत्सर्जन वाढविण्याच्या प्रक्रियेत भारतासह इतर देशांना ओढून घेतले आहे. प्रगत तंत्रज्ञान देण्याचे निमित्त करून या देश आपली जीवनशैली, जैवविविधता, पारंपरिक शेती प्रक्रिया उद्ध्वस्त करण्यास कारणीभूत ठरत आहेत,' अशी टीका त्यांनी केली. देशातील पीक उत्पादन प्रक्रियेमध्ये गेल्या काही वर्षात वाढलेला रसायनांचा वापर, शेतकऱ्यांवर थोपलेली जनुकसंस्कारित पिकांमुळे घसरेली जमिनीची गुणवत्ता, धान्यातील घटते जीवनसत्त्व अशी उदाहरणे देऊन शिवा यांनी औद्योगिक क्रांतीचा शेती उत्पादनावर झालेल्या परिणामाचे वास्तव उलगडले. जैवविविधता ही भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. रासायनिक शेतीच्या माध्यमातून आलेल्या परदेशी गुंतवणुकीमुळे जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे. सोयाबीन तेलातील भेसळ, बीटी कॉटनमुळे औद्योगिक देशांनी आपल्याला परावलंबी केले आहे. एकीकडे विकसित देशात हरित अर्थव्यवस्थेला महत्त्व दिले जात असताना भारताने आपल्या परिसंस्थेकडे, जैवविविधतेकडे, तसेच ज्ञानपद्धतीकडे दुर्लक्ष केले आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी भारताने वेळीच पावले उचली पाहिजेत, असा सल्ला शिवा यांनी दिला.en_US
dc.language.isootheren_US
dc.publisherDaily Maharashtra Times, Puneen_US
dc.titleप्रगत देशांपासून भारताने दूर राहावे : शिवाen_US
dc.typeArticleen_US


Files in this item

Thumbnail

This item appears in the following Collection(s)

Show simple item record