Show simple item record

dc.contributor.authorपरदेशी, दिपक
dc.contributor.authorPardeshi, D C
dc.contributor.authorचौधरी, नारायण
dc.contributor.authorChaudhari, N A
dc.date.accessioned2015-04-16T07:16:38Z
dc.date.available2015-04-16T07:16:38Z
dc.date.issued2015-04-16en_US
dc.identifier.citationhttp://epaper5.esakal.com/16Apr2015/Normal/PuneCity/page7.htmen_US
dc.identifier.urihttp://hdl.handle.net/10973/34600
dc.descriptionजगात सध्या नाट्यमय बदल घडताहेत. तंत्रज्ञानात होणाऱ्या प्रगतीचे वर्णन ‘कल्पनातीत’ असे करावे लागेल. ती प्रगती सर्व क्षेत्रे व्यापून टाकत आहे. ग्रंथपालनाचे क्षेत्रही त्याला अपवाद नाही. माहिती प्रदान करणाऱ्या सेवांमध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे. माहिती मागण्यासाठी ग्रंथपालांकडे येणारा ग्राहक हा ‘टेक्‍नोसॅव्ही’ तरुण आहे. त्याच्या बदलत्या गरजा, मागण्या हेच सध्याच्या ग्रंथपालांपुढील मुख्य आव्हान आहे, असे म्हणता येईल. ग्रंथपाल त्यांच्या परीने उत्कृष्ट सेवा देण्याचे प्रयत्न करीत असले तरी सध्याच्या तंत्रयुगात पारंपरिक ग्रंथालये बंद करावी लागतात की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. ग्रंथपालन व्यवसायाचे पूर्ण खासगीकरण होणार की काय, अशीही शंका आहे; परंतु भारतातील परिस्थितीचा विचार करता, ही भीती अनाठायी आहे. आपल्याकडे दोन परस्परविरुद्ध प्रवृत्तीचे ग्राहकांचे गट आहेत. एक म्हणजे टेक्‍नोसॅव्ही आणि डिजिटल माहितीची गरज असणारा , तर दुसरा म्हणजे प्रौढ व ज्येष्ठ नागरिकांचा. तो तंत्रकुशल नसला तरी, संशोधन, लेखन, वाचन यांची अतिशय आवड असणारा पारंपरिक ग्राहक होय. या दोन्ही घटकांकडून तत्पर, उत्कृष्ट सेवेची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. आज ‘इंटरनेट’वर सर्व काही उपलब्ध आहे, असे आपण मानत असलो आणि काही प्रमाणात ते खरे असले तरी, इंटरनेटवर बराच वेळ व्यतित करणारा ग्राहक तीच माहिती, पुस्तके-अहवाल इत्यादी पारंपरिक स्वरूपात ग्रंथालयात उपलब्ध आहे का, अशी विचारणा करतात. ती सहज मिळत असतील तर त्यांचा जास्त उपयोग करण्याकडे त्यांचा कल असतो.आज अनेक मोठमोठ्या ग्रंथालयांमध्ये ग्रंथसंग्रहांचा संपूर्ण डाटा संगणकावर उपलब्ध करून दिला असला तरी, पत्ररूप स्वरूपात उपलब्ध असलेली ‘तालिका’ सर्व ग्रंथपालांनी अजूनही जागेची कमतरता असूनदेखील टाकून दिलेली नाही. यावरून अद्यापही ग्राहकांचा कल मुद्रित साधनांकडे कसा आहे, हे स्पष्ट होते. वरील दोन्ही प्रकारच्या ग्राहकांच्या प्रचंड मागणीला प्रतिसाद देणे व त्या दृष्टीने तत्पर राहणे भारतातील ग्रंथपालांच्या दृष्टीने मोठे आव्हान आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पारंपरिक मुद्रित ग्रंथांचे मोठे प्रमाण असलेल्या ग्रंथालयांना सर्व ग्रंथसंपदा डिजिटल स्वरूपात परिवर्तित करणे अनेक कारणांनी शक्‍य नाही. भारतातील मोठमोठी विद्यापीठे तसेच संशोधन ग्रंथालयात एकूण ग्रंथसंख्या दहा ते पंधरा लाखांपर्यंत आहे व तेथील ग्रंथालये एकही ग्रंथ रद्दबातल करण्याच्या मनःस्थितीत नाहीत, असे दिसून येते. भारतातील ग्रंथपालनाच्या दृष्टीने सांगायचे तर नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करणे, हे त्यांच्या हिताचे ठरेल. आपण लवकरच निवृत्त होणार आहोत, म्हणून हे सर्व आपणास काय करावयाचे? अशी भूमिका न घेता आपल्याबरोबर कीम करणाऱ्या तंत्रकुशल व्यावसायिकांची मदत घेत, शिकत पुढील प्रवास करणे हेच श्रेयस्कर आहे. तसेच ग्रंथालय ग्राहकांना माहिती उपलब्धता सोयीस्कर करणे, वारंवार User Education Program राबवणे, माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने निरनिराळ्या प्रकारे संघटन करणे, यासाठी स्वतः Interactive राहणे जास्त गरजेचे आहे. ग्रंथपालाची मूळ भूमिका आजही बदललेली नसून, माहिती हाताळण्यासाठी लागणारी तंत्रे, पद्धती, साधने यामध्ये फक्त बदल झालेला आहे. तंत्रज्ञान कितीही विकसित झाले असेल, माहितीचे स्वरूप मुद्रित रूपातून Digital स्वरूपात परिवर्तित झालेले असेल तरीही, ग्रंथपालन व्यवसायाचे तत्त्वज्ञान बदललेले नाही. डॉ. एस. आर. रंगनाथन यांची पंचसूत्री अद्यापही प्रस्तुत आहे. ‘How to read book Technically’’ ही कला फक्त ग्रंथपालन व्यावसायिकांकडे उपलब्ध आहे. त्यामध्ये अद्यापही बदल झालेला नाही. त्यामुळे ग्रंथपालन व्यावसायिकांचे महत्त्व आजही कमी झालेले नाही.
dc.description.abstractग्रंथपालानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या सन्मानार्थ 'राष्ट्रीय ग्रंथपालन दिन' पाळण्याची रीत अमेरिकेने सुरु केली. १६ एप्रिलला हा दिवस पाळला जातो. त्यानिमित्त या व्यवसायापुढील आव्हानांविषयी …en_US
dc.language.isootheren_US
dc.publisherदैनिक सकाळ, पुणेen_US
dc.titleग्रंथापालानाची तंत्रे बदलली; आत्मा तोचen_US
dc.typeArticleen_US


Files in this item

Thumbnail

This item appears in the following Collection(s)

Show simple item record