Gokhale Institute of Politics and Economics Digital Repository
    • Login
    View Item 
    •   DSpace@GIPE
    • Dhananjayrao Gadgil Library
    • GIPE Newspaper Clippings
    • View Item
    •   DSpace@GIPE
    • Dhananjayrao Gadgil Library
    • GIPE Newspaper Clippings
    • View Item
    JavaScript is disabled for your browser. Some features of this site may not work without it.

    प्रगत देशांपासून भारताने दूर राहावे : शिवा

    Thumbnail
    View/Open
    2016-1-13-MaharastraTimes.pdf (47.08Kb)
    Date
    2016-01-13
    Author
    शिवा, वंदना
    shiva, Vandana
    Maharashtra Times, Pune
    Metadata
    Show full item record
    Abstract
    प्रगत देशांपासून भारताने दूर राहावे : शिवा म. टा. प्रतिनिधी, पुणे 'जागतिक तापमानवाढीमुळे ओढावलेल्या संकटांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर बाजारीकरण सुरू झाले असून प्रगत देश विकसनशील देशांवर त्यांची विचारसरणी आणि औद्योगिक उत्पादने लादण्याचा प्रयत्न करीत आहेत. पॅरिसमध्ये झालेल्या परिषदेमध्ये विकसित देशांनी भारताला मदत करण्याची तयारी दाखविण्यामागे छुपा अजेंडा आहे. आपण या प्रलोभनांपासून दूर राहिले पाहिजे,' असे मत पर्यावरण चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या डॉ. वंदना शिवा यांनी व्यक्त केले. गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सतर्फे डॉ. शिवा यांचे 'द पॅरिस क्लायमेट चेंज अॅग्रीमेंट : व्हॉट शूड इंडिया अँड वर्ल्ड डू' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या वेळी एच. एम. देसरडा व राजस परचुरे यांनीही मनोगत व्यक्त केले. संयुक्त राष्ट्र संघाच्या जागतिक हवामान बदल समितीने गेल्या पंधरा वर्षात घेतलेल्या विविध परिषदा आणि त्यातील निर्णय़ांचा धावता प्रवास शिवा यांनी मांडला. 'प्रगत देशांनी १९९२ मध्ये स्वतःवर काही बंधने लादून घेण्याबरोबरच विकसनशील देशांना मदत करण्याचे मान्य केले होते. कार्बन उत्सर्जन पाच टक्क्यांनी कमी करण्याचे ध्येय त्या वेळी निश्चित करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात गेल्या वीस वर्षात अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये पंधरा टक्क्यांनी उत्सर्जनामध्ये वाढ झाली आहे. या देशांनी गुंतवणूक आणि आर्थिक प्रगतीचे प्रलोभन दाखवून कार्बन उत्सर्जन वाढविण्याच्या प्रक्रियेत भारतासह इतर देशांना ओढून घेतले आहे. प्रगत तंत्रज्ञान देण्याचे निमित्त करून या देश आपली जीवनशैली, जैवविविधता, पारंपरिक शेती प्रक्रिया उद्ध्वस्त करण्यास कारणीभूत ठरत आहेत,' अशी टीका त्यांनी केली. देशातील पीक उत्पादन प्रक्रियेमध्ये गेल्या काही वर्षात वाढलेला रसायनांचा वापर, शेतकऱ्यांवर थोपलेली जनुकसंस्कारित पिकांमुळे घसरेली जमिनीची गुणवत्ता, धान्यातील घटते जीवनसत्त्व अशी उदाहरणे देऊन शिवा यांनी औद्योगिक क्रांतीचा शेती उत्पादनावर झालेल्या परिणामाचे वास्तव उलगडले. जैवविविधता ही भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. रासायनिक शेतीच्या माध्यमातून आलेल्या परदेशी गुंतवणुकीमुळे जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे. सोयाबीन तेलातील भेसळ, बीटी कॉटनमुळे औद्योगिक देशांनी आपल्याला परावलंबी केले आहे. एकीकडे विकसित देशात हरित अर्थव्यवस्थेला महत्त्व दिले जात असताना भारताने आपल्या परिसंस्थेकडे, जैवविविधतेकडे, तसेच ज्ञानपद्धतीकडे दुर्लक्ष केले आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी भारताने वेळीच पावले उचली पाहिजेत, असा सल्ला शिवा यांनी दिला.
    URI
    http://hdl.handle.net/10973/38573
    Collections
    • GIPE Newspaper Clippings [200]

    DSpace software copyright © 2002-2016  DuraSpace
    Contact Us | Send Feedback
    Theme by 
    Atmire NV
     

     

    Browse

    All of DSpaceCommunities & CollectionsBy Issue DateAuthorsTitlesSubjectsThis CollectionBy Issue DateAuthorsTitlesSubjects

    My Account

    LoginRegister

    DSpace software copyright © 2002-2016  DuraSpace
    Contact Us | Send Feedback
    Theme by 
    Atmire NV